Wednesday, May 25, 2011

एकदा काय झाले.............


एकदा काय झाले............. 


मैत्रीच्या त्या वाटेवरती वाट मी बघत होते.....
वाट बघता बघता स्वप्नेही रंगवत होते,







बालपणी हवे नव्ह्ते कुणी 
ना गप्पा मारायला
ना सिक्रेट शेअर कराया.


मैत्रीच्या त्या वाटेवरती वाट मी बघत होते.....
अचानक कुणाचा तरी पाऊलांचा आवाज जरा आला,
स्वप्नांच्या त्या गर्तेतुन अचानाक भास मला जरा ज़ाला


मी उभी रहिली आणि ’हिच का ती माझ्या स्वप्नातील मैत्रिन बरे?’
विचार करता करता आमची मैत्रिही झाली.
मग काय रोजच गप्पा आणी मस्ती


रोज तिला भेटायची आणि सगळं सगळं सांगयची
सगळं सांगितल्यावर काय बरं वाटायचं,
सगळं दुःख विसरुन गेल्यासारखं वाटायचं





कितीही वेळ बसंलं तरी गप्पा मात्र संपत नव्ह्त्या
थोडी थोडी चिडवाचिडवि तर व्हायची
त्याशिवाय त्या मैत्रीला मजाच काय होती


अशीच किती तरी दिवसांवर दिवस गेलीत 
जणु वाट्त होते की एक दिवसा वर फ़क्त एक रात्रच गेली.


नेहमी प्रमाणे मी तिची वाट बघत होते
पण वेळ झाला तरी ती अजुन आली नव्हती.
मैत्रीच्या त्या वाटेवरती वाट मी बघत होते.....


दिवसां वर दिवस गेलेत पण ती अजुनही आली नाही...
मैत्रीच्या त्या वाटेवरती वाट मी बघत होते.....



मैत्रीच्या त्या वाटेवरती वाट मी बघत होते.....
आता वाट बघाणेच माझ्या हातात शिल्लक राहिले होते.......
मैत्रीच्या त्या वाटेवरती वाट मी बघत होते.....



















No comments:

Post a Comment